Vastu Shanti Invitation Card Marathi | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका मराठी

Vastu Shanti Invitation Card in Marathi | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका

स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने…

स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची,
वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा XXवार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

ADVERTISEMENT

आपले नम्र –
स्थळ –


Vastu Shanti Invitation Marathi Format | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका मराठी

एक वीट श्रमाची… एक वीट कष्टाची एक वीट आई वडिलांच्या आशिर्वादाची
एक वीट बहिणीच्या प्रेमाची… आता हवी एकच वीट आपल्या सहकार्याची

सप्रेम नमस्कार वि. वि.
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
आमच्या नवीन वास्तूची शांती व सत्यनारायणाची महापूजा
__वार दिनांक __ रोजी __ वाजता आयोजित केली आहे.
तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळ
उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती…

ADVERTISEMENT

आपले स्नेहांकित –
स्थळ –                            मो –


Home Vastu Shanti Invitation in Marathi

||श्री गणेशाय नमः||

ईश्वराचा आशीर्वाद
श्रमाचे साफल्य, आई – आजीची पुण्याई,
मनाच्या स्पंदनात रचलेले सुंदर स्वप्न,
म्हणजे __ सदन
आमच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी वास्तुशांती सोहळ्यास
सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे ही विनंती…
__वार दिनांक :- __ वेळ:- __

ADVERTISEMENT

निमंत्रक-
स्थळ –                            मो –


Satyanarayan Pooja Invitation in Marathi | सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका मराठी

🙏 श्री सत्यनारायण महापूजा 🙏
__वार   दिनांक:- ___   वेळ:- __
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
आमच्या येथे श्री सत्यनारायणाची महापूजा
आयोजित करण्यात आली आहे..
तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह
तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती..!
निमंत्रक-
स्थळ-


Vastu Shanti and Satyanarayan Puja Invitation Marathi |

वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका मराठी मजकूर

वास्तूशांती व श्री सत्यनारायण महापूजा:

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
__वार  दिनांक :- ___ रोजी ____वाजता
आमच्या नवीन घराची वास्तूची शांती
व सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे
तरी आपण सहपरिवार, सहकुटुंब उपस्थित राहून
या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून,
स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती…
प्रीतिभोज:-
आपला नम्र-
निवास स्थान-


गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका मराठी | Griha Pravesh invitation Message in Marathi for Whatsapp

श्री गणेश कृपार्शीवादाने.. श्री स्वामी समर्थ कृपेने…
आईंच्या स्नेहाने.. स्वत:चे घरकुल उभारायची पूर्ण झाली अभिलाषा
ह्यात आपणा सर्वांचा कृपार्शीवादआहे मोलाचा.
प्रेम आणि आपुलकीने अलगद जपायचाय नात्यांमधला ओलावा.
जमावे सर्वांनी एकत्र असा मानस आहे अमुचा.
निमित्य आहे सगळ्यांच्या उपस्थितित
“ग्रह प्रवेश” सोहळा साजरा करण्याचा..!

||आपले नम्र||
ABC
||स्वागतोत्सुक||
XYZ

नुसतीचं लुडबुड :- चिल्लर पार्टी
दि. १५/०६/२०१७ गुरुवार
भोजन समारंभ:- सं.७.०० ते सं. १०.००
पत्ता:


Vastu Shanti Quotes in Marathi

🙏🏻🏡आग्रहाचं निमंत्रण 🏡
New Home 🏡 New Beginnings!!
finally Our Dream Has Come True!!
Hard work Pays Off🔥 Wait is over Now 😎♥️


🙏🏻सस्नेह निमंत्रण🙏🏻

स्वतःचे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं,
दिवसभर काम करून थकल्यावर
आरामासाठी चार भिंती आणि
त्यावर छप्पर हक्काचं असावं
ही प्रत्येकाचीच भावना असते..
आपल्या सर्वांच्या सदिच्छा,
आशीर्वाद आणि स्नेहानं तसेच
आई-वडिलांच्या पुण्याईने,
आमचं स्वप्न साकार होत आहे..


माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न शेवटी पूर्ण झाले..
शेवटी मी स्वत: साठी एक घर विकत घेतले आहे..
मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी साजरा करत असताना,
आपण सर्वानी माझ्याबरोबर सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे..!

Comments are closed.