वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई, मित्र, भाऊ, बायकोसाठी | Happy Birthday Wishes Marathi Kavita
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना..!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!!
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात…
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे…
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात,
पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो,
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!
तुमच्याशी असणारं आमचं नातं..
आता इतकं दृढ झालंय की
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते !
तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं…
आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता…
वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं,
तुमची साथ कधी सरूच नये…
सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत,
सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह…
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी,
या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना हवी असतात…
काही आपली माणसं!
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच,
आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns of the Day!
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे,
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे..
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने,
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
बागडावे तू नभी उंच उडावे तू,
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू..
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!
पहा आणखी – Happy Birthday Wishes in Marathi
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन,
तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन..
आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत,
कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत..
तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं..
तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल,
मी खरंच भाग्यवान आहे..
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की,
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..
आईने जन्म दिला,
ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझं खळखळत हास्य
म्हणजे आई बाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे…
वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा !
प्रेमिकेसाठी किंवा बायकोसाठी वाढदिवस कविता
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको.. काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!❤️️🥰
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!
तुझं माझं नातं खास आहे,
कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील,
पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील,
तुझं रुसणं फुगणं मला आवडतं,
त्यातूनच तुझं माझं नातं फुलतं,
हे नातं असंच बहरावं हीच माझी सदिच्छा,
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
वाहिनीसाठी वाढदिवस कविता
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस..!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते..
बाबांसाठी वाढदिवस कविता
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !
बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे
तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले
तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले
मला एक चांगले जीवन लाभले
तुमच्या मेहनतीने हे सारे घडले
चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला
दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला
तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा…
बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
प्रिय बाबा,
आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे..
पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस,
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा,
केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे!
आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो.. कीर्तिवंत हो..
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात..
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत.
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत..
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे..
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तुमचा मनमोकळा स्वभाव
आणि सगळ्यांशी अगदी
नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत..
या दोन्ही गोष्टींमुळे,
तुमचा सहवास नेहमीच
हवाहवासा वाटतो!
कुणाशीही, अगदी विचारांचे
मतभेद असणाऱ्या माणसांशीही,
तुमची अगदी जिवलग मैत्री असते..
म्हणून तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही
सगळ्यांचेच लाडके असता..
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं…
हेच त्याच्याकडे मागणं!
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मित्र असावा तुझ्यासारखा,
स्वतःच्या घासातला घास देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा,
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा,
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा..
खूप आले आणि खूप गेले,
पण मित्रा हृदयात घर तू केले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी…
वाढदिवसाच्या शुभकामना!
दिराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कविता
हळदीच्या पावलांनी या घरात आले,
माहेर विसरून या घरची झाले..
दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला,
जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला..
त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू?
कशी त्याची उतराई ठरू?
माझे आयुष्य त्याला लाभो,
हीच प्रार्थना करते..
माझ्या कृतज्ञेची अंजली,
त्याच्या पायी वाहते…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
प्रिय आजी,
अजुनही हवाहवासा वाटतो,
तुझा मायेचा स्पर्श!
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात,
तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी..
अजुनही आठवतात,
तुझी चांदोमामांची गाणी..
अजुनही हवीशी वाटते,
तुझ्या मायेची कुस..
अजुनही हवासा वाटतो,
तुझा आशीर्वाद
आणि जगण्याला
नवं बळ देणारी तू..
अजुनही… अजुनही…
हविहवीशीच वाटतेस!
परमेश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं…
हेच त्याच्याकडे मागणं!