Happy Birthday Wishes for Kaku or Kaki in Marathi | काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकूसाठी वाढदिवस शुभेच्छा.. | Birthday Wishes in Marathi for Aunty साधी भोळी काकू आमची,नाही तिला कोणाचा हेवा देवा..अन्नपूर्णेचा जणू तिने घेतला आहे वसा,येता जाता देते खायला..आईसारखा जीव लावते, आमच्यावर भरभरून प्रेम करते..आमच्या लाडक्या काकूला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! जिने आईसारखी माया लावली,नाही केला कधी दुजाभाव..गोकुळासारखे सौख्य नांदते,जिच्यामुळे घरात आज..जिच्यात होतो मला आईचा भास,अशी आमची काकू आहे खास..काकू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! साधी राहणी उच्च विचार घेऊन आली सासरी,याच शिकवणीची तिने दिली आम्हांला शिदोरी..खूप शिका मोठे व्हा, हीच तिची शिकवण,तिच्या आशीर्वादाने झाले आमचे कल्याण..काकू तुला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा ! काकू आमची आहे खास,फोनवर बोलते तासंतास..ओठावर लाली, हातात मोबाईल,काकूचा आमच्या थाटचं भारी..पण माया लावते खूप सारी..आमच्या …

Read more