शेतकऱ्यांचे हाल कविता

विराट सतरा करोडात गेला
धोनी पंधरा करोडात गेला..
जगाचा पोशिंदा मात्र
झाडावर लटकून मेला !!
भारत कृषीप्रधान की क्रिकेटप्रधान
हाच मोठा प्रश्न पडतो..
शेतकरी जगला काय मेला काय
सांगा कुणाला फरक पडतो !!
अरे एखादी मॅच तुम्ही
वावरात घेऊन पहा..
शेतकऱ्याची जिंदगी
एकतरी दिवस जगून पहा !!
खेळाडु सारखे करोड नको
फक्त पीक मालाला भाव द्या..
कृषिरत्न, कृषिभूषण नको
फक्त शेतकऱ्याला मान द्या !!!

शेतकऱ्यांचे हाल हि कविता आवडल्यास खालील Image वर क्लिक करून डाउनलोड करा आणि Share करायला विसरू नका..


सांगना रे देवा, असा का झालास तु निष्ठुर..?

संसार गेला वाहून माझा, आला नदीला पूर..!

उभ शेतच माझे, गेलय त्यात सार वाहून..!

नाही पाहिलंस तू, डोळे का घेतलेस झाकून..?

काळ पडलं सोयाबीन, जागीच फुटलय कोंब..!

उसळला पोटात आगडोंब, आता मारू कुठे बोंब..!

कोठून मिळणार आता, सडलेल्या धानाला उतारा..?

घशाला पडली कोरड, उघड्यावर सारा पसारा..!

सर्जा-राजाला माझ्या, कुठून आणू चारा पेंडी..!

झाली मनाची घालमेल, झाली सारीच कोंडी..!

घडी संसाराची माझ्या, आता विस्कटली सगळी..!

लेकीला माझ्या आता, कशी करू साडी चोळी..!

सांग देवा आता, कशी करू दसरा दिवाळी..?

होळी पेटली संसाराची, झालीरे राख रांगोळी..!

Poem By – Surendra Sulakhe

Shetkari Kavita

Shetkari Poem in Marathi

Shetkari Aatmhatya Kavita

Shetkaryanche Haal Kavita

Baliraja Kavita

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.