San Kavita Marathi | सण कविता मराठी

आले सण झाली घाई,
कवतिक लय बाई..

वर्षारंभी गं पाडवा,
किती गाऊ मी गोडवा..

आखिजीची न्यारी बात,
आमरस गोड भात..

झोके घेऊ पंचमीला,
राखी बांधू पुनवेला..

गौरी आणि गणपति,
हर्षोल्लास घरी अति..

नवरात्र नि दसरा,
दिवाळीचा गं नखरा..

संक्रांतीस देती वाण,
शिमग्यास रंग छान..

घरा येती सणवार,
अवघ्यास हर्ष फार..

Poem By – Shila Ambhure

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.