Premachi Manse Marathi SMS

शुभ सकाळ…!! प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी… आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना… माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!

Ek Number Marathi Joke

एक मुलगा देवाला विचारतो, “तिला गुलाबाचं फूल का आवडतं ? ते तर एका दिवसात मरून जातं…! मग तिला मी का आवडत नाही ? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”! देव उत्तर देतात, ☺ ☺ ☺ ☺ भारी रे…! एक नंबर…! Whatsapp वर टाक…!

Jar Shikshan Premasarkhe Aste Tar

लोक म्हणतात की, “खरंच जर शिक्षण प्रेमासारखं असतं तर” आपोआप झालं असतं… मी म्हणतो, “जर प्रेमच शिक्षणासारखं असतं तर” घरच्यांनी मारून मारून करायला लावलं असतं…

College Jivnatil Kavita

कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा” होती! “संगीता” वर प्रेम करावं, तशी “भावना” ही माझ्या मनात होती, “प्रेरणा” तर रोजच भेटायची! माझी “साधना” तर पक्की होती! पण “आशा” जवळ असतांनाही, माझ्या पदरात “आकांक्षा” पडली! माझी “अपेक्षा” अपेक्षाच राहीली! आणि माझ्या जवळ आता फक्त “कल्पना” राहीली! तर मला आता सांगा “कविता” कशी वाटली…