Vasubaras Wishes Greetings Quotes & Images in Marathi

या वर्षी वसुबारस / Vasubaras हा दिवस २१ नोव्हेंबर २०२२ रोजी येत आहे. या सणाला ( गोवत्स द्वादशी / Govatsa Dwadashi ) असेही म्हंटले जाते.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी ला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असे मानले जाते कि या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते. गाईमध्ये अनेक देवतांचा वास असल्याने तिच्या पूजनाने संतान सुख तसेच घरात सुख समृद्धी लाभते. दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी …

Read more

Lakshmi Pujan Wishes Greetings Quotes & Images in Marathi

अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजन हे २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात. संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी …

Read more

Dhantrayodashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा 2022

Dhantrayodashi Wishes in Marathi | Happy Dhanteras Wishes in Marathi Dhantrayodashi Wishes in Marathi 2022 : दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. दिवाळीच्या २-३ दिवसाआधी त्रयोदशीला हा सण येतो. यावर्षी धनत्रयोदशी हि २२ नोव्हेंबर २०२२ रोजी येत आहे. सोने चांदी तसेच वस्त्र खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली …

Read more

Narak Chaturdashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi

नरकचतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करायचा हा दिवस आहे. या दिवशी अभयंगस्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे व तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते. सूर्योदयापूर्वी स्नान केले जाणे म्हणजेच अभयंगस्नान. या दिवशी पहाटेपासून फटाके फोडायला सुरवात होते ती भाऊबीजेला संपते. Narak Chaturdashi Shubhechha Marathi जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केलात्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो!नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! Narak Chaturdashi Image Marathi सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावाअन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला …

Read more