Good Morning Images with Inspirational Quotes in Marathi

मित्रानो या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत Good Morning images with Inspirational Quotes Marathi. सकाळच्या शुभेच्छा जर काही प्रेरणात्मक – Inspirational संदेश देत असतील तर पूर्ण दिवस अगदी उत्साहात आणि सकारात्मक – Positive विचारात जातो. मनावर असलेले दडपण काळजी यांचा विसर पडून जीवन – Life हिमतीने जगण्याची उमेद मिळते.

Morning Motivational Thoughts in Marathi

जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी सुविचारांची आवश्यकता असते..
या पोस्टमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक असे Inspirational Good Morning Quotes Images in Marathi जे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना जीवन जगण्यासाठी आत्मबल – Self Confidence देतील आणि तुमच्या सुंदर दिवसाची सुरवात आणखी सुंदर बनवतील.  खाली दिलेले Good Morning Positive Thoughts आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला आणि खाली कंमेंट द्यायला विसरू नका.


Shubh Sakal Motivational

Shubh Sakal Motivational

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!


Nice Morning Thought Marathi

Nice Morning Thought Marathi

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!


Motivational Thought Marathi

Motivational Thought Marathi

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!


Shubh Sakal Inspirational Quote

Shubh Sakal Inspirational Quote Image

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!


Good Morning Motivational Images Marathi

Good Morning Motivational Images Marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!


Jinknyachi Maja Tevhach Yete

Jinknyachi Maja Tevhach Yete

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!


Jinknyachi Maja Tevhach Yete

Good Morning Inspirational Image

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!


जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..


जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल
तेव्हा ती गोष्ट आठवा
ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती..


कितीवेळा हरणार १ वेळेस, २ वेळेस,
अरे ९९९९ वेळा जरी हरलो,
तरी १०००० व्या वेळेस सुद्धा
मैदानात उतरणार..


तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.


प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…


माणसाला स्वत:चा “Photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “Image” बनवायला काळ लागतो..


वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल..


प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र
आपल्या हातात असतात..


Good Morning Quotes Inspirational

Good Morning Quotes Inspirational

जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा | Good Morning Quotes Images Marathi

या लेखातील Good Morning Quotes Marathi तुम्हाला खूप आवडतील. येथे आम्ही १०० पेक्षा जास्त असे सुंदर आणि निवडक Good Morning Marathi Wishes या पानावर पोस्ट केले आहेत, या लेखातील Good Morning Messages Marathi तुम्हाला रोज सकाळी शुभेच्छा पाठवायला मदत करतील. तुमची पहाट आनंददायी बनवा आमच्या गुड मॉर्निंग मराठी मेसेज ने. या पानावरील सर्व शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटल्या हे कंमेंट मध्ये कळवायला विसरू नका..


Good Morning Quotes Marathi

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
शुभ सकाळ !


चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
शुभ सकाळ!


लोक म्हणतात,
आयुष्य छोटं आहे..!
पण असं बिलकुल नसतं..
खरं सांगू,
आपण फक्त जगायलाच
उशिरा सुरवात करतो..!!
Good Morning !!


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली,
त्यांचे मोल कधी विसरू नका..


सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..!
Good Morning Have A Nice Day!


आमच्या घरात देवघर आहे
असे म्हणण्यापेक्षा,
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
ही भावना असावी..
देवाने आपल्याला
काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नये..
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!


शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…


शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..


चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!


Good Morning Messages Marathi

रस्त्याने जातांना येणारी
माझी शाळा मला विचारते,
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..
बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..


प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते..
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,
आयुष्य खूप आनंदात जाईल..
शुभ सकाळ !


जगातील कुठल्याही तराजूत
मोजता ना येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री..
शुभ सकाळ !


प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !


तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !


माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
शुभ सकाळ!


जगा इतकं कि,
आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ!


आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
शुभ सकाळ!


जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!


गुड मॉर्निंग मेसेज मराठी

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
शुभ सकाळ!


मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!


आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
सुप्रभात!


कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले..
म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
आणि रिकाम्या हातानेच बोलावले..
शुभ प्रभात !


शुभ सकाळ!
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!


गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!


मैत्री अशी करा,
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ!


Good Morning Wishes Marathi

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!

Shubh Sakal Motivational


जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!


सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!


ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!


जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!


Good Morning Images Marathi

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..


प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..


जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!


लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..
Good Morning!


ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!


Good MorninG
खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
शुभ सकाळ!


Good Morning Shayari Marathi

जी माणसं
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼


दुसऱ्याचं मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌
🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼


धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐


प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे..
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 👇👇👇
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁


तुमच्या चेहऱ्यावर असलेली
सुंदर “Smile” हीच आमची
शुभ सकाळ!
🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸


शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁


Good Morning SMS Marathi

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
🌻🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻🌻


मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने👌👌👌
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


नातं असं निर्माण करा की,
जरी आपण देहाने दूर असलो
तरी,
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..
🌞🌞🌞 !! शुभ सकाळ !! 🌞🌞🌞


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते👍
🌞🌞🌞 !! शुभ सकाळ !! 🌞🌞🌞


चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴


मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो..👍
🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲


सकाळी सकाळी,
मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना,
🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने
रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे👌
🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


Good Morning Thoughts in Marathi

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
ll🌷शुभ सकाळ🌷ll


卐 ॐ 卐
सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
🌞शुभ सकाळ🌞


ज्याला संधी मिळते,
तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो,
तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो,
तोच विजेता..
आनंद शोधू नका,
निर्माण करा..
💐शुभ सकाळ💐


जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..👌🏻
🌺ll शुभ सकाळ ll🌺


संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
💐💐 Good Morning 💐💐


खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात..
🌻☕ शुभ सकाळ☕🌻


हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹


🌷Good Morning🌷
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹


जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
💕 “Life is Very Beautiful”💕
😊🍁 शुभ सकाळ 🍁😊


माणसाच्या मुखात गोडवा..
मनात प्रेम..
वागण्यात नम्रता..
आणि,
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात..!
😊शुभ प्रभात..😊


🌷 शुभसकाळ 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!


काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
🙏🏼 Good Morning ​🙏🏼


अश्रू कितीही प्रामाणिक
असले तरी ||
💛💛 भूतकाळ परत आणण्याची ताकद,
त्यांच्यात नसते..!! 💛💛
💙💙झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो !!💙💙
💗💗सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास
गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..!!💗💗
म्हणुन,
💚💚 चुका एकांतात सागांव्यात
आणि,
कौतुक चारचौघात करावं.. 💚💚
नातं जास्त टिकतं.!!👫
💐🌿 शुभ सकाळ 🌿💐


👉 माणूस सर्व काही Copy
करू शकतो..
☝ पण नशिब नाही..😌 💐
•═════• 👑 •═════•
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.
•══• •══•
💖 GOOD MORNING 💖


गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
💐 शुभ सकाळ 💐
🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹🌹


विहिरीचे पाणी सर्व पिकाला
सारखेच असते तरी पण,
कारलं कडू ,
ऊस गोड तर,
चिंच आंबट होते..
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे..
तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे..
दोष कर्माचा असतो,
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाच जीव उपाशी रहात नाही..
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹


“वाईट दिवस” आल्यावर कधी,
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”..
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
🌼 शुभ सकाळ 🌼


या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही..
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल..
🌹 शुभ सकाळ 🌹😇


माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,
म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि स्वतःच जळते..
परंतु,
आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे..
मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठावं?
शांत रहावं..
स्वस्थ रहावं..
घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहावं..
आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही..
जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगावं..
🌹 🌹 शुभ सकाळ 🌹 🌹


👉 शुभ सकाळ शुभेच्छा | Shubh Sakal Wishes Status Images Marathi

Shubh Sakal Marathi Images

नमस्कार मित्रानो, या पानावर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट अश्या शुभ सकाळ मराठी इमेजेस पोस्ट केल्या आहेत. आशा आहे तुम्हाला या मराठी शुभ सकाळ इमेजेस नक्की आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर कराल.
Namaskar Mitrano, ya panavar amhi tumchyasathi best ashya shubh sakal Marathi images post kelya ahet. asha ahe tumhala ya Marathi Shubh Sakal Images nakki avadtil ani tumhi tya tumchya mitra ani maitrinina nakki share karal.

Good Morning Marathi Images

नमस्कार मित्रानो, या पानावर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट अश्या गुड मॉर्निंग मराठी इमेजेस पोस्ट केल्या आहेत. आशा आहे तुम्हाला या मराठी गुड मॉर्निंग इमेजेस नक्की आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर कराल.
Namaskar Mitrano, ya panavar amhi tumchyasathi best ashya good morning Marathi images post kelya ahet. asha ahe tumhala ya Marathi Good Morning Images nakki avadtil ani tumhi tya tumchya mitra ani maitrinina nakki share karal.