Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..! Happy Holi! 🙏हॅप्पी होळी🌸 आज होळी! आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! होळी हा सर्वांचा आवडता सण. या सणाची सर्व लहान थोर मंडळी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. होळी महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात अगदी उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. या लेखात आम्ही होळी सणाची माहिती आणि होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की खाली दिलेल्या होळीच्या शुभेच्छा (Holi Quotes in Marathi) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर नक्की शेअर कराल. होळी च्या दिवशी संध्याकाळी लाकडांची मोळी रचून …

Read more

Shubh Sakal Holi Shubhechha

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा… शुभ सकाळ ! होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Holi Wishes in Marathi for Family

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

Happy Holi Shubhechha

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा, रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा… Happy Holi !