Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पौर्णिमेच्या तुम्हाला
व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
Happy Holi!
🙏हॅप्पी होळी🌸

ADVERTISEMENT

आज होळी! आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! होळी हा सर्वांचा आवडता सण. या सणाची सर्व लहान थोर मंडळी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. होळी महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात अगदी उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.

या लेखात आम्ही होळी सणाची माहिती आणि होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की खाली दिलेल्या होळीच्या शुभेच्छा (Holi Quotes in Marathi) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर नक्की शेअर कराल.

होळी धूलिवंदन शुभेच्छा मराठी

ADVERTISEMENT

होळी च्या दिवशी संध्याकाळी लाकडांची मोळी रचून ती पेटवली जाते त्यास होलिका दहन असे म्हणतात. यामागे मोठी आख्यायिका आहे. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता आणि भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू यांना आपल्या मुलाने विष्णूची भक्ती केलेली आवडत नसे म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यासाठी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला प्रह्लाद ला मारण्याची कामगिरी सोपवली. होलिका ला आगीत न जळण्याचा वर होता. म्हणून ती प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये उतरली पण भक्त प्रलहादच्या अफाट शक्तीमुळे होलिकाच शेवटी आगीत भसम झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. म्हणून तेव्हापासून होलिका दहन केले जाते.

होळी सण हा दिल्ली, आग्रा आणि जयपूर या राज्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. उत्तर भारतीय या सणाला खूप मानतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजेच रंगांचा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना रंग लावून होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

ग्रुप मधील सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


लाडक्या मैत्रिणीला होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!


माझ्या आयुष्यात सुखाचे वेगवेगळे रंग भरणारे Dear नवरोबा,
आपणास होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!

 


माझ्या आयुष्यात सुखाचे वेगवेगळे रंग भरणारी Dear बायको,
तुला होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!


धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा | Dhulivandanchya Rangmay Shubhechha

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!


Happy Holi Wishes Marathi | हॅप्पी होळी शुभेच्छा

सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा | Holi Ani Rangpanchmichya Shubhechha

नैसर्गिक रंगांचा वापर करा!
पाण्याचा अचव्यय टाळा!
होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा..!


Holichya Hardik Shubhechha Status | होळीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


Holichya Rangmay Shubhechha | होळीच्या रंगमय शुभेच्छा

रंग ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे आयुष्य आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !


Rangpanchami Chya Shubhechha | रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंग काय लावायचा,
जो आज आहे तर उद्या निघून जाईल,
लावायचा आहे तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील…!
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !


होळीच्या शुभेच्छा | Holichya Shubhechha

उत्सव रंगांचा !
पण रंगाचा बेरंग करू नका..
वृक्ष तोडून होळी पेटवू नका..
नैसर्गिक रंगांचाच वापर करा..
मुक्या प्राण्यांना रंगवून त्रास देऊ नका..
फुगे मारून कोणाला इजा करू नका..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Holi Chya Hardik Shubhechha

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | Rang Panchami Chya Hardik Shubhechha


Holi Quotes in Marathi | होळी कोट्स मराठी

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू..
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू..
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Holi Messege in Marathi | होळी मेसेज मराठी

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!😇