गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha in Marathi

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा नारळी पौर्णिमा संपली कि, वेध लागतात गणेशोत्सवाचे. हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यात ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला’ गणेश चतुर्थी असते. या दिवसाकडे सर्व भक्त डोळे लावून वाट पाहत असतात.या दिवशी बुद्धीची देवता असलेले गणराया वाजत गाजत भक्तांच्या घरी विराजमान होतात. दहा दिवस चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडू नये म्हणून भक्तांचे प्रयत्न सुरु असतात. बाप्पाचे आगमन झाल्यावर घरातील संकट, दुःख हे सगळे दूर होणार हा भक्तांचा गणरायांवर विश्वास असतो. गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! …

Read more

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!

Ganesh Bhaktana Ganesh Chaturthichya Shubhechha

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!