Vait Divas Shikvan Detat
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात…
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात…
कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते…
चांगला गुरु तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते, उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्यांच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही…
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधरण्याची संधी देते…