Bhavacha Vadhdivas | Birthday Wishes for Brother

लहानपणापासून एकत्र राहतांना, भातुकलीचा खेळ खेळतांना, एकत्र अभ्यास करतांना, आणि बागेत मौजमजा करतांना, किती वेळा भांडलो असू आपण! पण तरीही मनातलं प्रेम, माया अगदी लहानपणी जशी होती तशीच ती आजही आहे.. उलट काळाच्या ओघात ती अधिकाधिक द्दढ होत गेली… याचं सारं श्रेय खरं तर तुला आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला! परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

Diracha Vadhdivas | Birthday Wishes for Brother in Law

हळदीच्या पावलांनी या घरात आले, माहेर विसरून या घरची झाले.. दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला, जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला.. त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू? कशी त्याची उतराई ठरू? माझे आयुष्य त्याला लाभो, हीच प्रार्थना करते.. माझ्या कृतज्ञेची अंजली, त्याच्या पायी वाहते… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बर्थडे विशेस मराठी

आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण… हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच.. पण आमच्या शुभेच्छांनी, वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा! Happy Birthday!!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने, मी इतकं कर्तृत्व करेन, की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार, तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार, या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे… खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी, तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!