Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi

यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात.

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट देतात. ते हिंदू कॉलनी, दादर इथे राहत होते.

हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि ह्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या पानावर आम्ही काही इमेजेस आणि संदेश (Mahaparinirvan Din Quotes Marathi) सादर करत आहोत. जे तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी किव्हा स्टेटस ठेवण्यासाठी वापरू शकता.

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना 64 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम!


विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!


पोटाची भूक तर भागवावीच,
पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,
शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..


जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिन


6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन फोटो

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने आज भारत देश चालतोय..
अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे..
जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे..
भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…
घासातील घास दुसऱ्याला देणे,
ही मराठी माणसाची संस्कृती आहे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!


नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!


मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते,
पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन!


तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक..
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन..!


दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
जय भीम !


प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !


समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून,
ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार..
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!


न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन्!


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही..


ताकद भिमा तुझ्या नावात आहे,
नाव घेतलं कि रक्त सळसळतं..
चार-चौघात जय भिम म्हणून तर पहा,
कोणाकोणाला मिर्ची लागली ते लगेच कळतं..


लाज नाही तर माज बाळगा दलित असल्याचा,
छोटा नाही तर मोठा आवाज महार असल्याचा,
रुबाब नाही तर ताकद ठेवा बौध्दीस्ट असल्याचा
कारण, वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा..


आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे..
ना कोण्या खासदाराचा हात आहे..
पण ज्याचा हात आहे, तो सगळ्यांचा बाप आहे..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास कोटी कोटी प्रणाम..!


फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही,
तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे,
आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..
जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते..
याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..
– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

1 thought on “Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.