Kojagiri Purnima Images Wishes & Quotes in Marathi

कोजागिरी किव्हा शरद पौर्णिमा का म्हणतात?

कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते, कारण हि पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. यादिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि ‘को जागर्ति’ म्हणत कोण जागत आहे हे पाहत पृथ्वीतलावर संचार करते. जागत असणे म्हणजे ज्ञानासाठी कोण जागृत आहे हे ती पाहते अशी धारणा आहे.

या दिवशी दूध आटवून त्यात केसर, पिस्ता, बदाम, चारोळी, जायफळ, इलायची, साखर इत्यादी टाकून मसाला दूध किव्हा खीर बनवून त्याचा लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवतात. मध्यरात्री त्या आटवलेल्या दुधात चंद्राची किरणे पडल्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. इंद्र आणि लक्ष्मी देवीची आराधना करून उत्तम आरोग्य आणि वैभवप्राप्तीसाठी रात्रभर जागरण करून व्रत केले जाते.

ADVERTISEMENT

अश्या या शुभ दिवशी आपल्या आप्तेष्ट मित्र ,मैत्रिणींना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन या दिवसाची गोडी द्विगुणित करा. आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी काही निवडक अश्या शुभेच्छा इमेजेस बनवल्या आहेत त्या तुम्हाला नक्की आवडतील. क्लिक करून डाउनलोड करा आणि शेअर करायला विसरू नका.

कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी | Kojagiri Purnima Status Marathi

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Happy Kojagari Pornima Marathi

Kojagirichya Hardik Shubhechha

शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Kojagiri Purnima Hardik Shubhecha Marathi

Kojagiri Purnima Hardik Shubhecha Marathi

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


कोजागिरी पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Pornima Hardik Shubhechha

Kojagiri Pornima Hardik Shubhechha

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


कोजागिरीच्या मध्यरात्री,
माता लक्ष्मी भूतलावर येई..
कोण असे जागा कटाक्षाने पाही,
तयावर संतुष्ट होऊन कॄपाशिर्वाद देई..

ADVERTISEMENT

पूर्ण चंद्रमा उगवला
आज उंच अंबरी..
स्वागत त्याचे करण्या
सजली अवघी नगरी..

पाहूनिया प्रतिबिंब तयाचे
करु त्यासी वंदन
शक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या
करु दुग्धप्राशन..


कोजागिरी पौर्णिमा कोट्स मराठी | Kojagiri Purnima Quotes Marathi

Kojagiri Purnima Quotes Marathi

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ..
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


Kojagiri Wishes Marathi

Kojagiri Wishes Marathi

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा..!


कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा


शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Sharad Purnima Wishes Marathi

दूध पिता नष्ट होई रोगराई..
शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली..
सौंदर्य वाढायला आहे भरपाई..
औषधीच दिव्य आहे चंद्रकिरणावली।।
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

रात्र पौर्णिमेची सजली ही अशी,
नववधू रुपेरी साजात जशी..
दूध आटवूया चंद्र प्रकाशात,
प्रतिबिंब पाहुया चंद्राचे त्यात..
कोजागिरी करू साजरी हर्षाने,
आश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने..
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन..
कोण कोण जागे हे पाहते,
लक्ष्मी दाराशी येऊन..
आजची कोजागिरीची रात्र सुखकारक व
आनंदाची उधळण करणारी जावो हीच सदिच्छा…!


कोजागिरी पौर्णिमा Image


Kojagiri Pornima Gif Image

Kojagiri Pornima Banner Background

Kojagiri Pornima Banner Background

Kojagiri Purnima Video Status Marathi

Download Video


 

कोजागिरी पोर्णिमेची,
महती ही प्रचलीत..
देवी लक्ष्मी विवरते,
कोण जागे या रात्रीत…
🌕🌟Happy kojagiri
Purnima.🌕🌟

…..

सुख संपत्ती मिळते,
लाभे आशीष तयास..
दिप दारी उजळता,
नमस्कार हो चंद्रास..
🥛🤩कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.🥛🤩

…….

दुग्ध शर्करेचा मेळ,
चंद्र हा प्रकाशमान..
महत्त्व आयुर्वेदात,
दुध अमृतासमान..
🌹🌜Happy kojagiri
Purnima 2022.🌹🌜

………

लक्ष्मी संगे कुबेर येई
घरी कोजागिरी,
धनधान्याची रास
कुंभी लावा दिप दारी..
🌕🎉कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🌕🌟

……

कोजागिरी पोर्णिमा ही,
बासुंदीची साथ करूनी..
आयुष्याचे क्षण हे हसरे,
लाभो तुम्हा सदैव जीवनी..
🙏हॅप्पी कोजागिरी
पौर्णिमा शुभेच्छा!🙏

…….

दूध पिता नष्ट होई रोगराई,
शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली..
सौंदर्य वाढायला आहे भरपाई,
औषधीच दिव्य आहे
चंद्रकिरणावली।।
🌟कोजागिरी पौर्णिमाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌟🌜

……..

आश्विनाच्या गोड मासी,
पुनवेची रात्र खासी..
शरदाचा ऋतू भारी,
चांदण्याची शोभा न्यारी..
जागे कोण देवी पाहे,
भक्तासाठी उभी राहे..
रातीचा या खास थाट
दुधाचाच असे घाट..
आयुर्वेद सांगे ज्ञान,
पौर्णिमेचा खास मान..
चांदण्यात बसा आधी
दूर होई रोग व्याधी..
🙏🌜कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌜

…….

मस्त ऋतू हा,
शितल रंग पांढरा.
शरदाची आली रात,
शोभे नभी चांदण्यात कोजागिरी..
🙏✨Happy kojagiri
Pornima.🙏✨

…..

आश्विन मासात पौर्णिमेच्या 🌜 मध्यरात्री
कोजागिरी पौर्णिमा होते साजरी,
दूध🥛 आटवून चांदण्यांच्या प्रकाशात
लुटती दूध पिण्याचा आनंद सारी!
🥳✨कोजागिरी पौर्णिमाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२२.🔥🎉

…….

कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी
भूतलावर अवतरीत होई,
कोण असे जागा कटाक्षाने पाही,
तयावर संतुष्ट होऊन कॄपाशिर्वाद देई!
🙏🥛कोजागिरी पौर्णिमाच्या
खूप खूप शुभेच्छा!🌟🌕

…..

पूर्ण चंद्रमा आज उगवला उंच कृष्ण अंबरी,
स्वागत त्याचे करण्या सजली सारी नगरी..
पाहूनिया प्रतिबिंब तयाचे करु तया वंदन,
शक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या करु दुग्धप्राशन..
🙏❣️कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🥛

……….

करूया जागरण या शीतल छायेत,
नृत्य, गायनाचीही मैफील सजवूया..
श्रीलक्ष्मीचे होईल आगमन सदनी,
तिच्या स्वागताची तयारी करूया…
🙏कोजागिरी पौर्णिमा
शुभेच्छा!🙏


Kojagiri Purnima calligraphy Png Text
Kijagiri Pornima Calligraphy