Janmashtami Wishes in Marathi | Gokulashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Janmashtami Wishes, Quotes, Message, SMS in Marathi

कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मित्रानो. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि इमेजेस. ( Janmashtami Quotes & images in Marathi ) कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कंस हा एक अत्याचारी राजा होता. देवकी हि कंसाची बहीण होती. देवकीचा ८वा पुत्र कंसाचा विनाश करेल या झालेल्या आकाश वाणीमुळे झालेल्या भीतीने कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव याला कारागृहात डांबले. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी या दिवशी कृष्णाचा जन्म मथुरा येथील कंसाच्या बंद कारागृहात झाला. आणि त्याच रात्री त्याला त्याचे पिताश्री वासुदेव यांनी कंसाच्या भीतीने गोकुळ गावात पोहचवले म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते.  खाली दिलेल्या गोकुळअष्टमीच्या शुभेच्छा ( Gokulashtami Wishes in Marathi ) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही इतरांना देखील शेअर कराल अशी आशा आहे.


Janmashtami Wishes in Marathi

गोकुळाष्टमी निमित्त,
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…!

ADVERTISEMENT


श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार..
ध्यान करा भगवंताचे,
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार..
Happy Janmashtami 2021

ADVERTISEMENT

 


Janmashtami Status in Marathi

कृष्ण ज्याचंं नाव,
गोकुळ ज्याचंं धाम..
अशा श्री भगवान कृष्णाला,
आमचा शतश: प्रणाम..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Gokulashtami Marathi MSG

गोकुळमध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास..
यशोदा, देवकी ज्याची मैय्या,
तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!


Gokulashtami Marathi SMS

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की,
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो..
शुभ गोकुळाष्टमी..!


हा जन्मोत्सव भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यादिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. श्रीकृष्णाचे भक्त हा उपवास दुसऱ्या दिवशी दही काला सेवन करून सोडतात. उपवासाच्या दिवशी दिवसभर पत्ते खेळून रात्री १२ नंतर जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. या दिवसाला गोपाळकाला असेही म्हणतात. गोपाळ म्हणजे सवंगडी काला म्हणजे एकत्रित करणे. एकत्र येऊन सर्व बालगोपाल एकमेकांच्या अंगावर उंच थर रचून दहीहंडी फोडतात आणि या दिवसाचा आनंद लुटतात.

Gopalkala & Janmashtami Marathi Wishes

श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला या
शुभ दिवसाच्या आपणास अनेक शुभेच्छा..!


Gokulashtami Status in Marathi

राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास..
मिळून साजरा करू,
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!


Gokulashtami Marathi Wishes

पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!


Janmashtami Thoughts Marathi

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Janmashtami Marathi SMS Text

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे।।
शुभ गोकुळाष्टमी..!


कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा

गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!


गोकुळाष्टमी मराठी शुभेच्छा

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा