Independence Day Quotes in Marathi | Happy Independence Day Marathi

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) म्हणून साजरा केला जातो. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेकांनी देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीअतोनात प्रयत्न केले. यासाठी या वीरांनी आपले रक्त सांडून अनेक प्रकारची आंदोलने केली होती. त्यांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि हा दिवस त्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्या वीरांचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभक्तीवर गायन आणि भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, याचे सर्व श्रेय त्या वीरांना जाते ज्यांनी दिवस रात्र एक करून आपले प्राण पणाला लावून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केले. त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम. चला त्यांना श्रद्धेची फुले अर्पण करूया आणि त्यांच्या आठवणीत आज त्यांच्यासाठी काही ओळी गाऊया. आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनासाठी खास चारोळ्या ( Independence Day Quotes in Marathi)  लिहल्या आहेत, ज्या तुम्हाला त्या वीरांच्या योगदानाची आठवण करून देतील. जर तुम्हाला त्या आवडल्या तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

ADVERTISEMENT

Independence Day Quotes in Marathi

देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो न कोणी..
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे..
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳


कधीच न संपणारा, ♾
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म,
म्हणजे देश धर्म…
🇮🇳 Happy Independence Day..!! 🇮🇳

ADVERTISEMENT

Happy Independence Day Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… ♾
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳


Independence Day Wishes In Marathi

ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकी धर्म आहे या देशाचा,
फक्त देशासाठी जगा..
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!! 🇮🇳

ADVERTISEMENT

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा

ना बोलीने, ना वागण्याने,
ना रंगांनी, ना ग्रीटिंगने..
🇮🇳 तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने..!! 🇮🇳


स्वातंत्र्यदिनासाठी SMS

टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो,
पण रक्तात मात्र देशाचं 🇮🇳 मीठ असलंच पाहिजे..!!!


स्वातंत्र्यदिनासाठी खास कोट्स

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳


Independence Day Shayari In Marathi

 प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, 🇮🇳
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर..
भारत माता की जय..!! 🙏


Independence Day MSG In Marathi

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा..
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳
वंदे मातरम्!


Independence Day Marathi Status

🇮🇳 तू माझी भारतभूमी,
मी तुझाच मावळा..
मी भारतमातेचा,
माझी भारतमाता.. 🇮🇳
जय हिंद..!!


Independence Day Marathi SMS

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज 🇮🇳
सर्वात उंच फडकतो आहे….
🙏 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!! 🙏


Independence Day Marathi Images

विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! 🇮🇳


Happy Independence Day Marathi SMS

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत,
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू,
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहू..
जय हिंद… जय भारत..!!!
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳


Independence Day Special Message in Marathi

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला..
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो,
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया…
🇮🇳 Happy Independence Day..!! 🇮🇳


उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत..
स्वातंत्र्य दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!