Happy Mothers Day Marathi Images, Quotes, Messeges

आईच्या लाडक्या लेकांना मदर्स डे च्या शुभेच्छा! मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आई ही सर्व जगाची जननी आहे, आईमुळेच तर या जगाचे अस्तित्व आहे. स्त्री नसती तर ही सृष्टी चाललीच नसती. तुम्हा आम्हाला हे जग बघायला मिळाले नसते. आई निसर्गाचा एक अविष्कार आहे. प्रेमळ, काळजी करणारी, आपल्याला दुःखात बघू न शकणारी, आपली प्रगती करणारी, आपल्याला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपणारी अशी आई निसर्गाचे एक वरदान आहे. तिच्या कर्तृत्वाची परतफेड आपण कधीही करू शकत नाही, परंतु तिला आज मदर डे ला तिने केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून तिला मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.


Matrudinachya Hardik Shubhechha

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात “आई” नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात.!
“स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी..
“आ” म्हणजे “आत्मा”.
“ई” म्हणजे “ईश्वर” (परमात्मा)..
आत्मा व परमात्मा यांचे एकरुप..
ती ‘आई’

ADVERTISEMENT


Mothers Day Wishes Marathi

मुंबईत घाई शिर्डीत साई
फूलात जाई गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी केवळ आपली आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Mother’s Day Mom!


आज मातृदिन निमित्ताने आपण तिला काही प्रेमळ शुभेच्छा आणि एखादे खास गिफ्ट देऊन तुम्हीही तिच्यावर तेवढेच प्रेम करता याची जाणीव करून देऊ शकता. आज आपल्या आईला एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जा, किव्हा तिची बऱ्याच दिवसापासून मनात राहिलेली इच्छा पूर्ण करा. तिला जे आवडेल ते आज करा. कारण आज दिवस आहे तिने केलेल्या उपकाराची जाणीव करून घेण्याचा, लहानपणापासून चे तिचे कष्ट, मेहनत आठवण्याचा, तिने तुम्हाला आजपर्यंत इथवर आणल्याबद्दल तिला सॅल्यूट करण्याचा.. तुमच्या प्रगतीमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे.

ADVERTISEMENT

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मिटलेलं फुल आणि पोटात जपलेलं मुल
उमलत जातांना पहाण्याचं भाग्य फक्त
झाडाला आणि आईला मिळतं..
कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा,
तो एक असा आरसा आहे,
ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत..!
देशातील सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


लहानपणी आपल्याला आई बाबांची गरज होती, आज आपण मोठे झाल्यावर त्यांना आपली गरज आहे, हे निसर्गाचे चक्र आहे, उद्या तुम्हालाही म्हातारपणात तुमच्या मुलांची गरज भासेल याची जाणीव ठेवून त्याच्यावर कधीही दुर्लक्ष करू नका. त्याचा सांभाळ करा. तुमच्या भल्यासाठी जर त्यांनी तुम्हाला शिक्षा ही दिली असेल तरी वेळप्रसंगी तुमचा तेवढा लाड ही केला आहे. आजचा दिवस आपल्या आईला, मम्मीला, मॉमला Happy Mothers Day बोलून आम्ही लिहलेल्या शुभेच्छा संग्रहातून एखादी शुभेच्छा द्यायला विसरू नका.. देव तुमचं कल्याण करो.

ADVERTISEMENT

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”
Happy Mothers Day!


आईशिवाय माझे अस्तित्वच नाही..
आई असतें जन्माची शिदोरी,
सरत ही नाही आणि उरतही नाही…
सर्व भारतीय मातांना या शुभ दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !


तू नसशील तर,
या जगण्याला अर्थच काय?
जन्मोजन्मी तूच असावी
प्रेमळ माझी माय..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy Mothers Day Messeges Marathi

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला..
Happy Mother’s day Mom !


Happy Mothers Day Quotes Marathi

आकाशाचा केला कागद
समुद्राची केली शाई..
तरी आईचा महिमा
लिहिता येणार नाही..
Happy Mother’s day Mom !


Mothers Day Image

Happy Mothers Day Images