गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्माचे हे नववर्ष देखील आहे. म्हणून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून काही संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा अगदी उत्तम दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून देखील या दिवसाचे महत्व आहे.
गुढी पाडव्याला दाराबाहेर रांगोळी काढून गुढी उभारली जाते. घरात गोड स्वयंपाक केला जातो. एकमेकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. नवीन कपडे, सोने खरेदी, वाहने किंवा नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी हा अगदी शुभ दिवस आहे. विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली उंच गुढी हि देखील हेच दर्शवते कि होणारे कार्य आभाळासारखे उंच प्रगतीदायक ठरो.
तुम्ही देखील या शुभ दिवशी काही नवीन संकल्पास सुरुवात करावी आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी या शुभ मुहूर्ताचा फायदा घ्यावा. कोरोना मूळे जरी घराबाहेर जाणे झाले नाही, तरी व्हाट्सएप्प, फेसबुक आणि ट्विटर च्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देता येतील. म्हणून आम्ही आपल्यासाठी या पानावर घेऊन आलो आहोत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश / Gudi Padwa Wishes in Marathi आणि इतर बऱ्याच सुंदर अश्या गुढीपाडवा शुभेच्छा इमेजेस / Gudi Padwa Images, ज्यातुन तुम्ही तुमच्या शुभेच्छा सोशल मीडिया द्वारे व्यक्त करू शकता.
Gudi Padwa corona Wishes Marathi
जगावरील कोरोनाचे संकट टळून,
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,
हीच या शुभदिनी सदिच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Gudi Padwa Shubhechha
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा शुभेच्छा / Gudhi Padwa Shubhechha
सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..
शुभ गुढीपाडवा!
Nutan Varshachya Hardik Shubhechha
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Wishes in Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gudi Padwa Chya Hardik Shubhechha
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudhipadvyachya Shubhechha in Advance
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी..!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Message in Marathi
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आज मराठी वर्षातील पाहिला दिवस..
आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या
व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला
हार्दिक शुभेच्छा..!
शुभ सकाळ!
Gudi Padwa Quotes in Marathi
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Gudhipadvyachya Shubhechha
निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Gudhi Padvyachya Hardik Shubhechha
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Gudi Padwa Marathi Shubhechha
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Hardik Shubhechha SMS
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Nutan Varshabhinandan SMS
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!
Happy Gudi Padwa SMS in Marathi
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!
Gudi Padwa SMS in Marathi
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!
Gudi Padwa Shubhechha in Marathi
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!