गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Gajanan Maharaj Prakat Dinachya Hardik Shubhechha 2022
Gajanan Maharaj Prakat Din 2022: संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रकटदिन यंदा बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. योगायोग असा की यावर्षी प्रकटदिनाची तारीख अणि तिथि एकाच दिवशी जुळून आली आहे. गजानन महाराज कसे प्रकट झाले कुठून आले याची सहसा कुणालाच माहिती नाही पण पहिल्यांदा बंकटलाल आणि दामोदर या दोन व्यक्तींना गजानन महाराज नग्न अवस्थेत दिसले. शेगावच्या एका वटवृक्षाखाली एक गोरा तरुण मुलगा उष्ट्या पत्रवाळ्यातील भात खात होता आणि गण गण गणात बोते असा मंत्रजप करत होता. साधारणतः महाराजांचे वय त्यावेळी ३०-३२ असावे असा उल्लेख आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गजानन महाराजांनी समाधी घेतली. दररोज लाखो भक्त त्यांच्या या समाधीस्थळी दर्शनासाठी येत असतात. प्रकटदिनाच्या दिवशी शेगाव मध्ये खास व्यवस्था असते. भारतभरातून लाखों भक्त यादिवशी दर्शनासाठी येतात. महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेले अनेक चमत्कार प्रचलित आहेत. महाराजांचे त्यांच्या भक्तांच्या मनात आजही विशेष असे स्थान आहे. आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी काही विशेष शुभेच्छा संदेश / Gajanan Maharaj Prakat Dinachya Shubhechha आम्ही या लेखात दिले आहेत. ते तुम्ही त्यांच्या भक्तांसोबत जरूर शेअर करावे.
Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi| गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा मराठी
॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
!! जय गजानन माउली !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Gajanan Maharaj Prakat Din Status | गजानन महाराज प्रकट दिन स्टेटस
अनंत कोटी,
ब्रम्हांड नायक,
महाराजाधिराज,
योगीराज,
परब्रह्म,
श्री सच्चिदानंद,
भक्तप्रतिपालक,
शेगाव निवासी,
समर्थ सदगुरु
श्री संत गजानन महाराज कि जय..!
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा…!
Gajanan Maharaj Prakat Din Quotes Marathi| गजानन महाराज प्रकट दिन कोट्स मराठी
॥ गण गण गणात बोते ॥
नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर..
फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य,
लाभले जीवनी गुरु गजानन..
जरी कुडी माझी दुजे गावी,
प्राण माझा गुरु चरणी शेगांवी ।।