शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Teachers Day Greetings in Marathi

Happy Teachers Day Quotes & Wishes in Marathi

सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Teachers Day Greetings Marathi

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी टीचर डे सर..!

ADVERTISEMENT

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरुराया,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy Teachers Day Marathi

योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,
जेव्हा काहीच कळत नाही,
तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..
आयुष्यातील प्रत्येक अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही..
हॅपी टीचर्स डे..!


अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या,
ज्ञानरुपी गुरुंना..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Happy Teachers Day Sir Marathi

गुरुजी आपल्या उपकारांचे,
कसे फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी,
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत,
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना..
💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐


माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपणा पासून ते आज पर्यंतचे सर्व मित्रपरिवार,
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेल्या,
अश्या सर्व शिक्षकांना शतशा वंदन. 🙏
💐 आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

ADVERTISEMENT

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आपण केवळ आमचे शिक्षक नाही,
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात..
सर्व एकाच व्यक्तीमध्ये आकार घेतलेले..
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू..
शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!


शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Funny Teachers Day Wishes in Marathi

2G, 3G, 4G,
5G, 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG,
शिवाय पर्याय नाही..
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!


घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!


Teachers Day Quotes in Marathi

एक पुस्तक,
एक पेन,
एक विद्यार्थी,
आणि एक शिक्षक,
हे संपूर्ण जग बदलू शकतात..


आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,
आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
हॅपी टीचर्स डे..!


प्रिय टीचर,
मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि
मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद..🙏
जर तुमचा आशिर्वाद
सदैव माझ्यासोबत असेल,
तर माझं यशही असंच कायम राहील..
💐 हॅपी टीचर्स डे. 💐


शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात,
जे स्वतः जळून,
विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात..
मला भेटलेल्या प्रत्येक शिक्षकाला,
💐 शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐


Teachers Day Wishes for Retired Teachers in Marathi

माझ्या सर्व रिटायर्ड शिक्षकांसाठी..
तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं
करियर आणि त्यांचं आयुष्य घडवलंय..
आज मी जे काही आहे ते फक्त
तुम्ही मला दिलेल्या ज्ञानामुळे..
तुमचे खूप खूप आभार.. 🙏
माझे आवडते शिक्षक कोण विचारल्यावर,
आजही मी तुमचंच नाव घेतो..
तुमच्या उत्तम आरोग्याची
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो..
🌷 हॅपी टीचर्स डे 🌷


Teachers Day Wishes in Marathi

गुरूविना ज्ञान नाही,
गुरूच्या ज्ञानाला अंत नाही..
गुरूने जिथे दिलं ज्ञान,
तेच खरं तीर्थस्थान..


शिक्षणाच्या ज्योतीतून,
अज्ञानाचा अंधार दूर करत,
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन🙏
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


5 सप्टेंबर..
माजी.राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन,
यांच्या जन्मदिवसा निमित्त,
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏
शिक्षक दिवस निमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा..!💐💐
सर्व शिक्षक गुरूजनांना नमन🙏