Sankashti Chaturthi Wishes Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हंटले जाते, तर शुक्ल पक्षातील चतुर्थी ला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टी हा गणेशाच्या भक्तांचा आवडीचा दिवस. या दिवशी गणेशाचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि आपल्या इच्छाप्राप्तीसाठी आणि कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी देवाकडे आराधना करतात. गणेशाच्या प्रिय भक्तांसाठी आम्ही या लेखात खास निवडक असे १०० पेक्षा जास्त संकष्टी चतुर्थी शुभेच्छा ( Sankashti Chaturthi Wishes in Marathi ) घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे कि या लेखातील सर्व संकष्टी चतुर्थी संदेश ( Sankashti Chaturthi Quotes in Marathi ) तुम्हाला नक्कीच आवडतील.


Sankashti Chaturthi Wishes in Marathi

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Sankashti Chaturthi Wishes in Marathi

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

Sankashti Chaturthi Photo

Sankashti Chaturthi Images in Marathi

Sankashti Chaturthi Image

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Sanakashti Chaturthi Hardik Shubhchha

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! संकष्टी हा कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारा दिवस. संकष्टी चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेही म्हंटले जाते. वर्षातून १२ संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या प्रत्येक मंदिरात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेशाचे भक्त यादिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या लेखात दिलेले संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा बाळगतो.


आज संकष्टी चतुर्थी!
आजच्या या मंगल दिनी,
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Image

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Sankasht Chaturthichya Hardik Shubhechha

Sankasht Chaturthichya Hardik Shubhechha

​आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।