Wadhdiwasachya Hardik Shubhechha

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

Birthday Wishes in Marathi

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी, या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना हवी असतात… काही आपली माणसं! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय… Many Many Happy Returns of the Day!

Vadhdivsachya Shubhechha Marathi

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Tuza Vadhdivas Marathi SMS

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस… अभिनंदन!