भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahavir Jayanti Wishes Marathi

आज महावीर जयंती! तुम्हा सर्वाना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील Mahavir Jayanti Wishes in Marathi. आम्ही भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त काही निवडक अश्या सुंदर Images या पोस्ट मध्ये दिल्या आहेत. त्या डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

महावीर जयंती श्लोक | Mahavir Jayanti Shlok

मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतम प्रभु,
मंगलम स्थुलीभद्राधा, जैन धर्मोस्तु मंगलम

Mahavir Jayanti Wishes Marathi

भगवान महावीरांबद्दल थोडक्यात माहिती | वर्धमान महावीर माहिती मराठी | Mahaveer Jayanti Mahiti Marathi

जैन धर्माला प्रभावशाली बनवण्याचे फार मोठे श्रेय महावीर वर्धमानकडे जाते. चैत्र शुद्ध त्रयोदशीला वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. महावीरांचा जन्म बिहार मधील कुंडलपुर राज्याचा राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशालादेवी यांच्या पोटी झाला. ते जैन धर्मातील २४ वे तीर्थकार होते. आई-वडिलांनी त्यांचे वर्धमान असे नाव ठेवले होते. परंतु ते महावीर या नावानेच जगप्रसिद्ध झाले.

महावीर जयंती Status Marathi

बालपणापासूनच महावीरांची प्रवृत्ती चितनशील व वैराग्यशाली होती. महावीर यांचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा आदर्श होय. लोकांना माणुसकी पासून टूर लोटणारा धर्म, यज्ञयागातील पशुहत्या इत्यादी पाहून, माणूस फक्त स्वताचाच विचार का करतो? धर्मापासून दूर का राहतो? इत्यादी प्रश्नांनी ते अस्वस्थ होऊन गेले. यशोदा बरोबर विवाहबद्ध होऊन सुद्धा ते वैराग्य अनासक्त वृत्तीने राहिले.

महावीर जयंती शुभेच्छा मराठी

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे,
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा!

वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि बारा वर्ष खडतर तप केले. गृहत्यागानंतर सुरवातीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला होता. दंश करणाऱ्या कीटकांची देखील त्यांनी कधी हत्या केली नाही.लोकस्थिती चा अभ्यास या असंख्य अनुभवांनी ते ज्ञान संपन्न झाले. त्या काळात अज्ञानी लोकांनी त्यांचा खूप छळ केला. पण त्यांनी तो शांतपणे सोसला. तीस वर्षे म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत ते धर्मउपदेशच करीत राहिले.

Mahavir Jayanti Marathi Wishes

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला
प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!

लोकांनी आपले वैरभाव विसरून काम, क्रोध द्वेष, मत्सर यांचा त्याग करून विवेकाने आणि संयमाने वागावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणासाठी ते संपूर्ण भारतभर हिंडले. महावीरांनी जातिव्यवस्थेवर प्रचंड विरोध केला आणि सर्व जाति जमातींच्या लोकांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले. स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे महत्व त्यांनी पटवून दिले.यज्ञयागातील हिंसेला त्यांनी विरोध केला. संयम व शुद्ध आचरणाचा मार्ग त्यांनी लोकांना सांगितला.

Mahavir Jayanti Quotes Marathi

ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला तो जेता, त्यांचा तो जैन धर्म. अहिंसा, त्याग, क्षमा, समता इत्यादी गुणांची परमावधी त्यांच्या ठिकाणी झाली होती. महावीर जयंतीनिमित्त त्यांची देवळे सजवून लोक मिरवणूर् काढतात, द्वेषभाव विसरून लोक एकमेकांना भेटतात. हातात कोणतेही शस्त्र ना घेता घडविलेल्या वेगवेगळ्या शौर्याने अहिंसात्मक विचारसरणीचे लाखो अनुयायी महावीरांनी तयार केले.

महावीर जयंती शुभेच्छा संदेश मराठी

Mahavir Jayanti Abhivadan Marathi | महावीर जयंती अभिवादन

अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
आणि जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा!
महावीर जयंती अभिवादन

Bhagvan Mahavir Jayanti Nimitta Abhivadan

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा…