Akshaya Tritiya Shubhechha, Wishes, Quotes, Images & Status in Marathi

आज अक्षय तृतीया! सर्वप्रथम तुम्हा सर्वाना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाणारी अक्षय तृतीया ही या वर्षी 14 मे ला साजरा केली जाणार आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ( Akshaya Tritiya Wishes in Marathi ) घेऊन आलो आहोत.

अक्षय तृतीया चा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही क्षय ना होणारे, कधीही नष्ट न होणारे. म्हणून या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. याच कारणामुळे हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो. असे म्हटले जाते कि, या दिवशी विष्णू देवाचा सहावा अवतार परशुरामाचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते. व्यापारी, शेतकरी, गुंतवणूकदार, सोने खरेदी किव्हा कपडे खरेदी तसेच तप व साधना या सगळ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी मुद्दाम सोनंही खरेदी केलं जातं कारण ते अक्षय राहतं व लवकर विकण्याची वेळ येत नाही. या दिवशी एकमेकांना अक्षय तृतीया च्या शुभेच्छा दिल्या जातात.

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥
अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..को
रोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!


Akshay Tritiya Managalmay Shubhechha


Akshay Tritiya Nimitt Shubhechha

आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!


प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!


सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Akshay Tritiya

नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
आनंदाने भरलेला असो संसार..
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो,
सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव..
हॅपी अक्षय तृतीया!


अक्षय तृतीया शुभेच्छा

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..
शुभ अक्षय तृतीया !


Akshay Tritiya Banner Marathi


आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!
आणि नेहमी प्रमाणे “सुप्रभात”


अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!


प्रार्थना आहे की आपणास
आणि आपल्या कुटुंबास,
ही अक्षय तृतीया सुख, समृद्धी,
आणि भरभराटीची जावो..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा..!


अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे..
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की,
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी,
उत्साह आणि धनाची कधीही कमतरता न येवो..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्यासारखी मौल्यवान माणसं,
आमच्याशी नातं जोडून आहेत..
परमेश्वरापाशी मागणं एकच,
आपलं हे सुख अक्षय राहू दे..!

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌹शुभ सकाळ🌹
आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो!

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत.
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!