Holi Mahiti Information in Marathi | Holi Essay in Marathi
मित्रानो या पानावर आम्ही होळी सणाची मराठीमध्ये माहिती सादर करत आहोत. या लेखाचा वापर तुम्ही होळी निबंध म्हणून देखील करू शकता. शाळेमध्ये मुलांना होळीबद्दल १० ओळी लिहून आणा असे सांगतात, अश्यावेळी तुम्ही या लेखातील खाली दिलेले १० पॉईंट्स वापरू शकता.
Holi 10 Lines Marathi | होळीवर १० ओळी
1) होळी हा रंगांचा सण आहे जो संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो.
2) हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
3) होळीच्या दिवशी लाकडे एकत्र करून ती जाळली जातात त्यालाच होलिका दहन असे म्हणतात.
4) होलिका हि राजा हिरण्यकश्यपू ची बहीण होती जिने भक्त प्रल्हाद ला अग्निमध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
5) होळीच्या अग्नी मध्ये सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो. म्हणून भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हाद ला होलिका दहनापासून वाचवले.
6) होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि गोड स्वयंपाक बनवला जातो.
7) होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. या दिवशी एकमेकांना गुलाल आणि रंग लावला जातो.
8) होळी खेळताना रासायनिक रंग वापरू नका, त्याने डोळे व त्वचेचे नुकसान होते. केवळ नैसर्गिक रंग वापरा.
9) फुगे तोंडावर किंवा डोक्यावर फोडू नका. सुरक्षित होळी खेळा.
10) हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
2021 मध्ये होळी कधी आहे
हिंदू पंचांगानुसार २०२१ मध्ये होळी २८ मार्च आणि धूलिवंदन २९ मार्च ला आहे. हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण आहे जो प्रत्येक धर्मातील लोक मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करतात. प्रत्येक पंथ, जाती आणि धर्मातील लोक आपल्या जुन्या तक्रारी विसरून एकमेकांना मिठी मारतात, एकमेकांना गुलाल आणि रंग लावतात. व्हाट्सएप व इतर सोशल मीडियावर होळीच्या शुभेच्छा आणि संदेश पाठवून एकमेकांना लांब राहून देखील शुभेच्छा दिल्या जातात. रंगांच्या उत्सवाच्या आदल्या दिवशी होलिका पेटविली जाते. यामागेही एक आख्यायिका आहे.
होळी का साजरी करतात?
भक्त प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यप स्वत: ला देव मानत असत आणि विष्णूला विरोधी मानत असत. भक्त प्रल्हाद विष्णूचा खूप मोठा भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला मान्य नव्हते. जेव्हा आपल्या मुलाने विष्णूची भक्ती करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना राग आला. म्हणून त्यांनी प्रल्हादाला ठार मारण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी आपली बहीण होलिकाची मदत घेतली. होलिका ला आगीत न जळण्याचे वरदान मिळाले होते. होलिका भक्त प्रल्हाद सोबत चितेवर बसली, परंतु भगवान विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हाद सुरक्षित राहिले आणि होलिका आगीत जळून खाक झाली. हि घटना हे सूचित करते की सत्य नेहमीच वाईटावर विजय मिळवते. म्हणूनच आजही पौर्णिमेच्या दिवशी होळी जाळली जाते.
होळी कशी साजरी करतात?
प्रत्येक ठिकाणी होळीची जागा ठरलेली असते. त्या ठिकाणी एक छोटा खड्डा तयार केला जातो, आणि त्या तयार केलेल्या खड्डया मध्ये झाडाची एक फांदी लावून त्या फांदिला लागून गोलाकार लाकडे रचून होळी तयार केली जाते. नंतर तयार केलेल्या होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो, आणि तिची पूजा केली जाते. मग हि होळी पेटवतात आणि होळी भवती गोल चक्कर मारत सगळे गाणी म्हणत नाचतात. असे म्हणतात कि होळीच्या ह्या अग्निमध्ये सर्व वाईट क्रूर गोष्टींचा अंत होतो.
होळीचा दुसरा दिवस म्हणजेच रंगपंचमी किंवा धूलिवंदन
दुसर्या दिवशी लोक एकमेकांना गुलाल व रंगीबेरंगी रंग लावून आनंद साजरा करतात. म्हणूनच याला रंगपंचमी किंवा रंगांचा सण म्हणतात. या दिवशी लोक लवकर उठतात आणि नातेवाईकांच्या घरी जातात. एकमेकांबद्दल द्वेष विसरून एकमेकांना मिठी मारतात. मुलांसाठीही हा सण खूप खास असतो. होळीच्या 4 दिवस आधी ते फुगे, पिचकारी आणि सर्व प्रकारचे रंग आणून ठेवतात. होळीच्या दिवशी एखादा ग्रुप बनवून उत्सव मोठ्या मजेने साजरा करतात.
महिला घरी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, पुरणपोळी बनवतात. एकमेकांना मिठाईचे वाटप केले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मथुरा, वृंदावन आणि काशीची होळी भारतात प्रसिद्ध आहे.
रंगपंचमी खेळताना अशी घ्या काळजी
आजकाल होळी खेळतांना रासायनिक रंगांचा वापर केला जातो ज्यामुळे डोळे व त्वचेचे नुकसान होते. म्हणून केवळ नैसर्गिक रंग वापरा. फुगे तोंडावर किव्हा डोक्यावर फोडू नका. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. व्यसनापासून दूर रहा आणि काळजीपूर्वक होळी खेळा आणि या सणाला सुरक्षित उत्सव बनवा. होळीच्या शुभेच्छा!
या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास होळीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत (होळीच्या शुभेच्छा मराठी), ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटूंबियांना पाठवू शकता. आम्ही आशा करतो की आपल्याला या पानावरील सर्व शुभेच्छा आवडतील.