Rakshabandhan Wishes Marathi Images

या लेखात दिलेल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा Images तुम्हाला नक्कीच आवडतील. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. हा दिवस बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण ( रक्षाबंधन ) म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या हाताला राखी बांधते. भावाची प्रगती व्हावी, त्याला दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्याने आपले रक्षण करावे अशी त्यामागची मनोकामना असते. हातात बांधलेल्या राखीला साक्षी मानून भाऊ देखील बहिणीला सैदव तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो.

[image_from_cat catid=”515″ viewid=”dac18559me”]

आपल्यापेक्षा बलवान तसेच भावासमान असलेल्या आणि आपले रक्षण करण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीस स्त्री राखी बांधते. काही प्रांतात नोकर आपल्या मालकास, पत्नी आपल्या पतीला व मुलगी आपल्या वडिलांना देखील राखी बांधण्याची प्रथा आहे.

आख्यायिका अशी आहे कि देव आणि दानव यात युद्ध सुरु होते. देवांचा राजा इंद्र यांचेदेखील दानवांच्या शक्तीपुढे काहीच चालत नव्हते. अश्यावेळी इंद्र देवाची पत्नी शुची हिने युद्धाला जाण्यापूर्वी इंद्रा च्या मनगटावर विष्णू ने दिलेला दोरा ( राखी ) बांधली आणि त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला युद्धात विजय मिळाला. यामुळेच मनगटावर राखी बांधण्याची प्रथा रूढ झाली असे म्हंटले जाते.

या लेखात दिलेल्या रक्षाबंधन इमेजेस ( Rakshabandhan Images Marathi) तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला कंमन्टद्वारे कळवायला विसरू नका.