Je Lok Paishacha Jast Moh Kartat

जे लोक पैशाचा जास्त मोह करतात, ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत… या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो. पाहिले पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता. पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल याची नेहमी भीती वाटत राहते…

Jyancha Svabhav Jast Sadha-Saral Asto

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा, जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो, त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो… धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.

Aayushyatil Pratyek Kshan Sarvottam Aahe

चालू असलेला वर्तमानकाळ नाजूक आहे असे मानणे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…

Jo Krodhavar Niyantran Thevto

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते…